Header Ads

Header ADS

नाथपंथातील मुक्ताईने चिरकालीन चैतन्य निर्माण केले... ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ.रवींद्रजी भोळे

 

Nāthapanthātīla-muktā'īnē-cirakālīna-caitan'ya-nirmāṇa-kēlē-jyēṣṭha-samājasēvaka-pravacanakāra-ḍŏ-ravīndrajī-bhōḷē





नाथपंथातील मुक्ताईने चिरकालीन चैतन्य निर्माण केले-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ.रवींद्रजी भोळे 

लेवाजगत न्यूज पुणे (दिघी)-मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ ,गहिनीनाथ, निवृत्तीनाथ यांचा साक्षात्कारी प्रभाव असलेल्या आदिशक्ती मुक्ताई नाथपंथातील महान संत होत्या. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्तव्यापासून परांगमुख होत असताना कर्तव्य करण्याचा सल्ला दिला तद्वतच मुक्ताईने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना कर्तव्यापासून परंगमुख होत असताना ताटीच्या अभंगाद्वारे जगाचे कल्याण करण्याचा मंत्र दिला. 

     तसेच महान योगी,तपस्वी चांगदेवांना गुरु मंत्र देऊन त्यांचे गर्वहरण करून त्यांना शिष्य बनवले.आदिशक्ती मुक्ताई यांनी चिरकालीन चैतन्य निर्माण केले. नाथपंथातील आदिशक्ती मुक्ताई यांनी ताटीच्या अभंगाद्वारे जगाला महान संदेश दिला. तसेच मुक्ताईने चिरकालीन चैतन्य निर्माण केले असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ह भ प हिंदू रत्न डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान च्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. रवींद्र  भोळे पुढे म्हणाले की ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे, सोपान देवांनी पुरंदर येथे, निवृत्तीनाथांनी पैठण येथे समाधी घेतली. जलसमाधी, तटस्थ समाधी, तंत्र समाधी, पवित्र समाधी, चिरंजीव समाधी व संजीवन समाधी असे समाधीचे वर्णन असून अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम ,प्रत्याहार ,ध्यान, धारणा ,यातील समाधी हे अत्यंत उच्च परमात्मा स्वरूप होण्याची अवस्था आहे. चित्त व आत्मा पंच महा भुतांमध्ये विलीन करून चैतन्य निर्माण करणे व जगामध्ये चेतना निर्माण करणे हा उद्देश्य समाधीचा आहे. मात्र आदिशक्ती मुक्ताईने शरीर व आत्मा पंचमहाभूतांमध्ये विलीन करून पूर्ण ब्रम्हांड तेजोमय केले. हा अवर्णनीय सोहळा म्हणजे तेजो विलीन  सोहळा आहे. यामुळे भक्तांना चिरकाल , चिरंतर मोक्ष प्राप्तीचा संदेश याद्वारे मिळत असतो. असे मत डॉ. रवींद्र भोळे व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर ह भ प अमोल कोलते महाराज, ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे, ऋतुजा वराडे, प्राची तेजस पाटील, हेमंत झोपे अध्यक्ष समता भातृ मंडळ,डी वाय खर्चे , प्रदीप विश्वनाथ पाटील, आदिशक्ती मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.  याप्रसंगी ह भ प अमोल कोलते महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील हिंदू रत्न डॉक्टर रवींद्र भोळे, एनडीए परीक्षेमध्ये देशातून प्रथम आलेल्या ऋतुजा वराडे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल प्राची तेजस पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी श्री संत आदिशक्ती मुक्ताई पुरस्कार 2025 देऊन गौरव केला. स्मृतिचिन्ह , मानपत्र पुष्पगुच्छ व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी दहावी व बारावीतील 80% च्या वर गुण मिळवलेल्या गुणवंतांचा सन्मानही करण्यात आला. त्याचप्रमाणे मेडिकल क्षेत्रातील तसेच डेंटल क्षेत्रातील उल्लेखनीय संपादन केलेल्या भावी डॉक्टरांनाही सन्मानित करण्यात आले.   या कार्यक्रमात श्री मुक्ताई सेवक, सेविका, प्रतिष्ठित भावीक,भक्त, कीर्तनकार ,प्रवचनकार, टाळकरी, तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती नितीन किनगे यांनी केले. श्री अजय नारखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व भाविक भक्तांना श्री आदिशक्ती मुक्ताई देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.