Header Ads

Header ADS

जे. टी. महाजन सेमी इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग दुसऱ्या वर्षी १००% निकाल

जे. टी. महाजन सेमी इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग दुसऱ्या वर्षी १००% निकाल



लेवाजगत न्युज फैजपूर:- आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तीव्र स्पर्धेच्या युगातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य जे. टी. महाजन सेमी इंग्लिश मीडियम स्कूल प्रभावीपणे पार पाडत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे शाळेचा सलग दुसऱ्या वर्षी १००% निकाल!



या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या एकूण ४६ विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थ्यांनी ८०% व त्याहून अधिक गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे पहिल्या सहा विद्यार्थ्यांनी ९४% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्यामध्ये थारवी चौधरी हिने ९५.४०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. ओम चौधरी ९४.८०% (द्वितीय), आकांक्षा धांडे ९४.६०% (तृतीय), हर्षदा नारखेडे ९४.४०% (चौथा), तसेच पूर्वा इंगळे व रोशनी तळेले या दोघींनी ९४.२०% गुण मिळवत संयुक्त पाचवा क्रमांक पटकावला.


एकूण ३९ विद्यार्थ्यांनी ७९% पेक्षा अधिक गुण मिळवले असून, एक विद्यार्थी ६३.४०% गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष, विशेष सराव व शाळेतील अभ्यासावर दिला गेलेला भर हे मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले.


या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शरद जिवराम महाजन, उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी व मार्तंड गणपत भिरुड, सचिव विजय रघुनाथ झोपे, सहसचिव शशिकांत रामचंद्र चौधरी आणि सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे, प्राचार्य नंदकिशोर सोनवणे व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.