जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीचा निकाल पुन्हा शंभर टक्के
यज्ञा अतुल पाटील जिज्ञासा निलेश ढाके गितेश मनोहर नेहेते
जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीचा निकाल पुन्हा शंभर टक्के
लेवाजगत न्युज फैजपूर:- फैजपूर येथील जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा जपत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मूल्याधारित व कृतीयुक्त शिक्षण देत सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे कार्य करणाऱ्या या शाळेने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या यशामध्ये विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि व्यवस्थापन समितीचे योगदान महत्त्वाचे ठरले. यंदाच्या परीक्षेत यज्ञा पाटील हिने ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. जिज्ञासा ढाके हिला ९६.१० टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळाला, तर गितेश नेहेते याने ९६.०० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, इंग्रजी, हिंदी, मराठी, समाजशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, चित्रकला, क्रीडा, स्केटिंग आणि संगीत अशा विविध विषयांत उजवा ठसा उमटवला.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, शरद महाजन प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, शाळेच्या प्राचार्य मोझेस जाधव आणि पर्यवेक्षिका पुनम नेहेते यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत