पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सावदा रेल्वेस्थानकावर विविध सुविधांचा लोकार्पण सोहळा व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून २२ रोजी साडे नऊ वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सावदा रेल्वेस्थानकावर विविध सुविधांचा लोकार्पण सोहळा व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून २२ रोजी साडे नऊ वाजता
लेवाजगत न्यूज भुसावळ- विभागातील सावदा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत सर्वांगीण विकास करण्यात आला असून, प्रवाशांना अधिक सोयीस्कर, स्वच्छ व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळावा, या दृष्टीने विविध सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. २०२३ मध्ये या स्थानकाच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला होता आणि आता हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. याचा लोकार्पण सोहळा दिनांक २२ रोजी साडेनऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा सावदा रेल्वे स्थानकावर होईल.
सावदा रेल्वे स्थानकात आधुनिक माहिती प्रणाली- नवीन एनटीईएस आधारित उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच, कोच डिस्प्ले बोर्ड व प्लॅटफॉर्म इंडिकेटर बोर्ड बसवण्यात आले असून, प्रवाशांना रेल्वेची माहिती तात्काळ मिळणार आहे. स्वच्छतागृहे- महिलांसाठी प्रत्येकी एका प्लॅटफॉर्मवर २ स्वच्छतागृहे,पुरुषांसाठी प्रत्येकी एका प्लॅटफॉर्मवर २ स्वच्छतागृहे, दिव्यांग प्रवाशांसाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवर २ सुलभ स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा प्लॅटफॉर्म क्र. एकवर नवीन वॉटर कूलर बसवण्यात आला असून प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच बसण्याची आणि प्रतीक्षालय सुविधाः एकूण १६ नवीन स्टेनलेस स्टील बेंचेस (प्रत्येकी ३ प्रवाशांसाठी)बसवण्यात आले आहेत. द्वितीय श्रेणी प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय उपलब्ध करून देण्यात आले आहे.
स्थानक परिसरात आठ नवीन स्टेनलेस स्टील कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्मची पृष्ठभाग ग्रॅनाइट लावून तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तो अधिक आकर्षक आणि स्वच्छ झाला आहे.
सुलभ प्रवेशव्यवस्थाः प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायक हालचालीसाठी नवीन पादचारी पुलाची (फूट ओव्हर ब्रिज) उभारणी करण्यात आली असून, त्याला छतासह जिनेही आहेत. या सर्व सुधारणा अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत भुसावळ विभागात करण्यात आल्या असून, यामुळे प्रवाशांचा एकंदर अनुभव अधिक सुखद, सुरक्षित व सुसज्ज झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत