जळगाव वरून इंदूर जाणारी खाजगी शाईन ट्रॅव्हल आमोदयाजवळ झाली पलटी प्रवासी सुरक्षित
जळगाव वरून इंदूर जाणारी खाजगी शाईन ट्रॅव्हल आमोदयाजवळ झाली पलटी प्रवासी सुरक्षित
लेवा जगात न्युज आमोदा- तालुका यावल आज शनिवार रात्री सव्वा नऊच्या सुमारास पाऊस सुरू असताना भुसावळ वरून इंदूर येथे जाणारी शाईन ट्रॅव्हल(mp37p9090) आमोद्या जवळील वळणावर ब्रेक न लागल्याने शेतात जाऊन पलटी झाली यात ५० प्रवासी होते.दोन-तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे त्यांना डॉक्टर खासणे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
भुसावल वरून शाईन ट्रॅव्हल इंदूर येथे जात असताना आमोदयाच्या पुढे वळणावर पावसामुळे वळण लक्षात न आल्याने सरळ शेतात जाऊन उजव्या साईडने पलटी झाली गाडीमध्ये जवळजवळ ५० च्या वरती पॅसेंजर होते. चालक व वाहक ट्रॅव्हल पलटी झाल्यानंतर लगेच फरार झाले. एका महिलेला थोडीफार जखम झालेली असून बाकीचे सर्व प्रवासी सुरक्षित आहे.
प्रवाशाला विचारले असता दत्तात्रय रामदास कानडे प्रवाशाने सांगितले की आम्हाला काहीही समजले नाही, तोपर्यंत गाडी पलटी झालेली होती. गाडीवळणावर सरळ ब्रेक न लागल्याने शेजारील भागात जाऊन पलटी झाली प्रवाशांना आमोदा येथील ग्रामस्थांनी तसेच फैजपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी त्वरित पोहचल्याने त्यांना त्वरित डॉ खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावदा येथील रुग्णवाहिका व चालक व वाहक यांनीही जखमीत प्रवाशांचं इतर प्रवाशांना येथे हलवण्यास मदत केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत