Header Ads

Header ADS

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या X ची सेवा जगभरात ठप्प; पोस्ट शेअर करण्यात अडचणी, युजर्स हैराण

 

Microblogging platform X's service is down worldwide, causing users to be confused about the difficulty in sharing posts.


मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या X ची सेवा जगभरात ठप्प; पोस्ट शेअर करण्यात अडचणी, युजर्स हैराण





लेवाजगत न्यूज मुंबई -लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सची (ट्विटर) सेवा जगभरात ठप्प झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (२४ मे) संध्याकाळी जगभरात मायक्रोब्लॉगिंग X ची सेवा अचानक डाऊन झाल्यामुळे युजर्सना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अनेक युजर्सना एक्सवर पोस्ट शेअर करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं सांगण्यात येत आहे.


भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:४५ वाजेपासून भारतात X ची सेवा डाऊन झाली आहे. अनेकांना लॉग इन करण्यासाठी आणि अॅप वापरण्यासह वेबसाइट अॅक्सेस करण्यासाठी देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे याचा जगभरातील लाखो वापरकर्त्यांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.


तसेच डाउनडिटेक्टरच्या (Downdetector) माहितीनुसार वापरकर्त्यांच्या तक्रारींमध्ये संध्याकाळी ६ वाजेनंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांना या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हजारो युजर्स हैराण झाले आहेत. अनेक वापरकर्त्यांनी कंटेंट पोस्ट करण्यासाठी त्रुटी नोंदवल्या आहेत. तसेच प्लॅटफॉर्मवर काही अपलोड करण्यासाठी देखील अडचणी येत असून सतत बफरिंग होत असल्याचंही सांगितलं जात आहे.


दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या X ची सेवा जगभरात ठप्प झाल्यानंतर अद्याप तरी एक्स कंपनीकडून या मागचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभरातील असंख्य युजर्सना समस्यांना तोंड द्याव लागत आहे.


दरम्यान, याआधी देखील काही दिवसांपूर्वी काही वापरकर्त्यांना X च्या सेवेत अडचणींचा सामना करावा लागला होता. रात्रीच्या वेळी X चे डेटा सेंटर बिघडल्याचं तेव्हा सांगितलं असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एक्स वापरकर्त्यांना पोस्ट करणे, लाईक करणे, कमेंट करणे किंवा शेअर करणे यात अडचणी येत होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.