उरण तालूक्यातील चिर्ले ग्राम पंचायतीच्या उप सरपंच पदी काँग्रेसचे जेष्ट नेते श्रीकांत पाटील यांची निवड
उरण तालूक्यातील चिर्ले ग्राम पंचायतीच्या उप सरपंच पदी काँग्रेसचे जेष्ट नेते श्रीकांत पाटील यांची निवड
उरण : सुनिल ठाकूर-उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत मध्ये शेकाप विरोधात काँग्रेस भाजपा अशी आघाडी आहे. नुकताच झालेल्या उपसरपंच निवडी मध्ये काँग्रेस भाजपा आघाडी चे उमेदवार काँग्रेस चे जेष्ठ नेते श्रीकांत पाटील (मते 7) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार सौ. रंजना तुळशीराम मढवी (मते 5) यांचा पराभव होऊन काँग्रेस भाजपा युतीचे उमेदवार श्रीकांत पाटील हे उपासरपंच पदी निवडून आले. यावेळी काँग्रेस नेते. डॉ. मनिष पाटील,युवा नेते संतोष राम पाटील,भाजप नेते दिपक शेठ पाटोल, समिर शेठ मढवी, राजन शेठ घरत,गांव अध्यक्ष विलास मढवी सदानंद मढवी, दहा गांव प्रमूख विनोद पाटील तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य रामनाथ मढवी आदी सह ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस चे जेष्ठ नेते यांची चिर्ले ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्याच्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत