Header Ads

Header ADS

फैजपूरमध्ये हॉटेलमधील बिलाच्या वादातून भीषण हाणामारी; तिघे गंभीर जखमी, चौघांवर गुन्हा दाखल


 फैजपूरमध्ये हॉटेलमधील बिलाच्या वादातून भीषण हाणामारी; तिघे गंभीर जखमी, चौघांवर गुन्हा दाखल


लेवाजगत न्युज फैजपूर (lewajagat news): येथील सुभाष चौकात मंगळवारी (दि. १०) रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलमधील बिलाच्या वादातून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान जातिवाचक शिवीगाळ व त्यानंतरच्या हिंसक हल्ल्यात झाले. हॉटेल व्यवस्थापक व त्याच्या दोन मित्रांना गावठी कट्ट्यासह रोखून बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या थरारक घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून, फैजपूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.


याप्रकरणी शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख व आकिब शेख या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.



घटनेचा तपशील:

यावल रोडवरील हॉटेल तृभावी येथे मंगळवारी दुपारी बिलावरून वाद झाला होता. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापक सुमित ऊर्फ छोटू मार्तंड साळुंके (रा. फैजपूर) याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. याच जातिवाचक शिवीगाळीचा जाब साळुंके यांनी फोनवरून विचारल्यावर वाद अधिक चिघळला.


या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी रात्री सुभाष चौकात सुमित साळुंके आणि त्याचे मित्र अमोल तायडे व सागर भालेराव यांना गाठले. आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू व गावठी कट्ट्याचा वापर करत तिघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पोलिसांची कारवाई:

सुमित साळुंके यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



आरोपीं पैकी शेख आरिफ, शाहरुख शेख व आसिफ शेख यांना अटक करण्यात आली असून, आकिब शेख अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो.नि. रामेश्वर मोताळे, पीएसआय नीरज बोकील व विनोद गभाने करत आहेत.


अशी घटना समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत असून, पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.