रेल्वे तिकीट प्रक्रियेत मोठे बदल; आरक्षण तक्ता आता २४ तास आधी तयार होणार
रेल्वे तिकीट प्रक्रियेत मोठे बदल; आरक्षण तक्ता आता २४ तास आधी तयार होणार
लेवाजगत न्युज दिल्ली:-
रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट आरक्षण प्रक्रियेत दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. यामध्ये आता ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधीच आरक्षण तक्ता तयार केला जाणार आहे. सध्या हा तक्ता केवळ ४ तास आधी तयार केला जातो.
रेल्वे विभागाने हा बदल पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला असून लवकरच देशभर राबवला जाणार आहे. यामुळे वेटिंग यादीतील प्रवाशांना तात्काळ निर्णय घेणे सुलभ होईल.
तसेच तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, १ जुलैपासून आधार ओळख अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवासी फक्त आधार प्रमाणीकरण करूनच तात्काळ तिकीट बुक करू शकतील. ही सुविधा वेबसाइट, अॅप आणि पीआरएस काउंटरवर OTP पद्धतीने वापरता येईल.
रेल्वेने रद्द तिकीटांबाबतही नवे नियम लागू केले आहेत. ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी तिकीट रद्द केल्यास फक्त २५ टक्के रक्कम परत मिळेल. १२ ते ४ तासांपूर्वी रद्द केल्यास ५० टक्के रक्कम परत केली जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत