Header Ads

Header ADS

जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

 जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

Free-skill-development- training-organized for- youth-of-Jalgaon-district


लेवाजगत न्यूज जळगांव:- जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनवण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या मार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

Free-skill-development- training-organized for- youth-of-Jalgaon-district


               जिल्हा वार्षिक योजना DPC (सर्वसाधारण) अंतर्गत ‘प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान – किमान कौशल्य विकास कार्यक्रम’ सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणार आहे. योजनेचा उद्देश म्हणजे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढवणे, तसेच उद्योग व इतर क्षेत्रांना कुशल मनुष्यबळ पुरवणे.


            या योजनेत १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांमार्फत मोफत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना शासनातर्फे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल.


या प्रशिक्षणात पुढील क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे:





१. कृषी

२. ऑटोमोटिव्ह

३. फूड प्रोसेसिंग

४. ब्युटी अँड वेलनेस

५. BFSI

६. कन्स्ट्रक्शन

७. डोमेस्टिक वर्कर्स

८. इलेक्ट्रॉनिक्स

९. हँडीक्राफ्ट व कार्पेट

१०. हेल्थकेअर

११. हॉस्पिटॅलिटी व टुरिझम

१२. पॉवर

१३. मीडिया अँड एंटरटेनमेंट

१४. कॅपिटल गुड्स

१५. लॉजिस्टिक्स

१६. मॅनेजमेंट

१७. स्पोर्ट्स अँड फिटनेस

१८. टेलिकॉम


           अधिकाधिक युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल लिंक  https://tinyurl.com/4ms5nbtt वापरून तात्काळ नोंदणी करावी असे  आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.