पॉलिटेक्निक ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढ
पॉलिटेक्निक ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढ
लेवाजगत न्यूज फैजपूर:- पॉलिटेक्निक प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक १६/०६/२०२५ हा कालावधी दिलेला होता. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे कागदपत्रके अपूर्ण असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करायचे राहिलेले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अपूर्ण कागदपत्रे जमा केलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचे पत्र डीटीइ/डिप्लोमा - ॲडमिशन/नोटिस/पॉली२०२५/२३५ इएन दि. १६/०६/२०२५ नुसार विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक २०/०६/२०२५ ते २६/०६/२०२५ पर्यंत मुदत वाढविलेले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची व्यवस्था जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे विनामूल्य करता येईल व योग्य मार्गदर्शन केले जाईल असे माननीय प्राचार्य पी.एम. राणे यांनी सुचवलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत