Header Ads

Header ADS

लग्नासाठी श्रीमंत ‘स्थळं’ शोधून फसवणारी टोळी गजाआड; वडवणीत संगमनेरच्या तीन महिलांसह चौघांना अटक


Gang of fraudsters, including three women from Sangamner, arrested in Gajaad Vadvani



 लग्नासाठी श्रीमंत ‘स्थळं’ शोधून फसवणारी टोळी गजाआड; वडवणीत संगमनेरच्या तीन महिलांसह चौघांना अटक

 वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर : श्रीमंत घरच्या मुलांची ‘स्थळं’ शोधून त्यांना लग्न करून देण्याच्या बहाण्याने लुटणारी चौघांची टोळी वडवणी पोलिसांनी गजाआड केली. या प्रकरणी तीन महिलांसह कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक बनावट नवरी आहे. त्यांच्याकडून एक चारचाकी व एकाच नावाचे विविध आधारकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली.


Gang of fraudsters, including three women from Sangamner, arrested in Gajaad Vadvani


वैभवी शेटे (नवरी), मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीण), रणजीत अहिरे (कारचालक, तिघेही रा. संगमनेर) व यमुनाबाई (मध्यस्थी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीच्या गुन्ह्याबाबत सांगण्यात आले की, वडवणी पोलीस ठाण्यात ३ जून रोजी मनीषा नरेंद्र ननावरे (वय २५) ही तिची मैत्रीण वैभवी राम शेटे हिला घेऊन आली. तिने पोलिसांना माझ्या मैत्रिणीला तिच्या घरच्यांनी डांबून ठेवले होते व मी तिला सोडवले, अशी हकीकत कथन केली. सुरुवातीला महिला अधिकारी या नात्याने वडवणीच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी वैभवी व मनीषा यांची चौकशी केली. तसेच सोडवणूक करणाऱ्या चालकालाही बोलावून घेतले. या तिघांनाही बोलावून घेतल्यानंतर त्यांची स्वतंत्र चौकशी केली. यामध्ये मनीषाचे दोन दिवसांपूर्वी नुकतेच वडवणी तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय तरुणाशी लग्न झालेले असून, त्यांनी सध्या लग्नासाठी मुली मिळत नाही, आजारासाठी मनीषाच्या मावशीला व तिच्या काकाला त्यांनी तीन लाख रुपये नगदी दिले, अशी माहिती मिळाली. तसेच मनीषाकडे वेगवेगळे आधारकार्ड असून, तिचे काका व मावशीही बनावट असल्याचे समोर आले.


लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक गरीब, सर्वसाधारण तसेच प्रतिष्ठित कुटुंबांचा शोध घ्यायचा. लग्न होत नसलेल्या तरुणांना सुंदर मुलगी दाखवायची. नंतर तिच्या आईला कर्करोग झाला आहे किंवा तिला आई-वडीलच नाहीत व इतर काही आर्थिक अडचण सांगून पैसे उकळून पसार व्हायचे. तसेच पळून जायला जमले नसल्यास त्याच कुटुंबाविरुद्ध पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करायची. तक्रार मागे घेण्यावर तडजोड करून पुन्हा नवीन ग्राहक शोधणे, अशी या टाेळीची गुन्हे करण्याची पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील महिला रणजीत अहिरेच्या चारचाकी वाहनाचा मुलगी दाखवण्यासाठी अथवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी वापर करत होत्या, असे तपासात समोर आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.