Header Ads

Header ADS

अस्तित्वात नसलेला जात प्रमाणपत्र प्रकरण कोचुर खुर्द सरपंच वर गुन्हा दाखल करा-ग्रामपंचायत सदस्यांची निवेदनाद्वारे मागणी

 



Gram Panchayat members demand through petition to file a case against Kochur Khurd Sarpanch

कोचुर खुर्द सरपंच वर गुन्हा दाखल करा-ग्रामपंचायत सदस्यांची निवेदनाद्वारे मागणी


अस्तित्वात नसलेला जात प्रमाणपत्र प्रकरण

लेवाजगत न्यूज मौजे कोचुर खुर्द- तालुका रावेर येथील अनुसूचित जमाती जागेसाठी ज्योती संतोष कोळी सरपंच पदी निवडून आले असून त्यांनी एसटी टोकरे कोळी जातीचा अस्तित्वात नसलेला दाखला अनुसूचित जमाती जागे वरती निवडणूक लढवून अस्तित्वात नसलेला जातीचा बोगस दाखला दाखल करून तात्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी यांची फसवणूक केलेली आहे .याबाबत कोचुर खुर्द ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तायडे यांनी महाशय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल करून ज्योती संतोष कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यामुळे त्यांना पदावरून अपात्र करण्यात यावी अशी सुनावणी मा. जिल्हा अधिकारी जळगाव यांच्या समोर घेऊन ज्योती संतोष कोळी यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी अपात्र घोषित केले आहे.





तरी महाशय आम्ही जात वैधता पडताळणी समिती धुळे यांच्याकडे तात्कालीन तहसीलदार जळगाव यांचे कडुन मिळालेला जातीचा बोगस बनावट दाखला जळगाव तहसीलदार यांच्या कडून देण्यात आलेला नसल्याचे लेखी पुराव्यानिशी कळवले आहे ज्योती संतोष कोळी यांची खोटे कागदपत्र व अस्तित्वात नसलेले जातीचे बनावट प्रमाणपत्र याबाबत तक्रार दाखल केलेली असून यांच्यावरती ४२० फौजदारी सहित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे 

तरी महाशय तात्कालीन निवडणुकीत ज्योती संतोष कोळी यांनी अस्तित्वात नसलेला टोकरे कोळी जातीचा बनावट दाखला आपल्याकडे सादर करून निवडणूक लढवून विजयी झालेले आहे तरी

महाराष्ट्र शासन नवीन आदेशानुसार 30 एप्रिल प्रमाणे अपात्र झालेल्या ज्योती कोळी यांना नव्याने सरपंच पद बहाल करण्याचा आदेश मा. जिल्हा अधिकारी यांनी पारित केला असून या आदेशाच्या अनुषंगाने ज्योती कोळी या सरपंच पदी विराजमान झालेल्या आहे तरी त्यांनी आपल्या निवडणूक शाखेमध्ये निवडणुकीत अस्तित्वात नसलेला जातीचा बनावट बोगस दाखला जोडून निवडणूक लढवून विजयी झालेले असुन निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना अस्तित्वात नसलेला बोगस बनावट जातीचा दाखला वरती निवडणूक लढवून फसवणूक केल्या प्रकरणी 420 सहित पुन्हा दाखल करावा आम्हाला योग्य न्याय मिळावा ही विनंती अन्यथा सात दिवसाच्या उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे त्यावर ग्रामपंचायत सदस्य कविता किशोर पाटील ,गणेश ज्ञानेश्वर महाजन ,प्रशांत बाबुराव तायडे,लिलाबाई घनश्याम तायडे यांच्या सह्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.