Header Ads

Header ADS

वै.डिगंबर महाराज पायी दिंडीचे चिनावलला भव्य स्वागत

 

Vai-Digambar-Maharaj-Pai- Dindi-Chinavalla-Gorgeous-Welcome



वै.डिगंबर महाराज पायी दिंडीचे चिनावलला भव्य स्वागत

लेवाजगत न्यूज चिनावल ता.रावेर ( वार्ताहर )  वै.डिगंबर महाराज चिनावलकर आषाढीपायी दिंडीचे आज चिनावल येथे आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले परंपरेप्रमाणे आजचा पहिला मुक्काम चिनावल येथे आहे दिंडीचे हे ४१ वे वर्षे आहे .

     वारकरी संप्रदायात पायी दिंडी चालत जाणे व तोंडाने हरिनामाचा गजर करणे हे सुख त्रिभुवनी नाही अशा भव्य दिव्य थाटात गेल्या ४१  वर्षापासून दरसाल खानापूर तालुका रावेर येथून निघणाऱ्या वै.डिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडी चा पहिला मुक्काम चिनावल येथे हभप लिलाधर रेवाजी कोल्हे यांच्याकडे असतो आज खानापूर येथून वैकुंठपासी डिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती रावेर यावल तालुका च्या मार्गदर्शनाखाली तसेच दिंडी परंपरा अधिपती ह भ प दुर्गादास महाराज नेहेते यांच्या नेतृत्वाखाली ह भ प भगवंत महाराज व खानापूर तसेच रावेर तालुक्यातील वारकऱ्यांच्या सहकार्याने दिंडी आज दिनांक सहा रोजी मार्गस्थ झाली.






     आजचा पहिला मुक्काम चिनावल येथे असल्याने दिंडीचे चिनावल येथे टाळ मृदंग हरिनामाच्या गजरात मोठ्या भक्ती भावात गाव शिवेवर आगमन होताच ग्रामस्थांनी हरिनाम गजर करीत टाळ,मृदंग,भजन,अभंग गायन करित ग्रामस्थ महिला  बंधू भगिनींनी दिंडीच्या गावातील प्रमुख मार्गावर सडा व रांगोळी काढून उत्स्फूर्तपणे दिंडीचे स्वागत केले. ह भ प लीलाधर कोल्हे व नवयुवक मित्र मंडळ चिंचवाडा येथे मुक्काम स्थळी मोठ्या भक्ती भावात आवागमन केले. दि ७ रोजी म्हणजे सकाळी सदर दिंडीचे चिनावल स्थित दिगंबर महाराज समाधी स्थळी पूजा अभिषेक होऊन रोझोदा मार्गे प्रस्थान करेल.

      सदर दिंडी तब्बल २३  दिवसात ५०० किलोमीटरचा पायी वारी करत वै.डिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती रावेर यावल तालुका च्या पंढरपूर स्थित वै .डिगंबर महाराज मठात २३व्या दिवशी पोहोचेल व येथे मुक्कामी असेल येथे दिगंबर महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण प्रसारक समिती रावेर यावल तालुका च्या वतीने येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था ठेवली जाते.

      वै.डिगबर महाराज चिनावलकर , विठ्ठल महाराज हंबर्डी कर , तसेच वै. अरुण महाराज बोरखेडा यांनी दिवसेंदिवस या पायी वारीला विस्तारात भव्य रुप दिले आहे सद्यस्थितीत ह भ प दुर्गादास महाराज नेहेते यांच्याकडे दिंडीचे नेतृत्व आहे सदर पायी दिंडी वारी वै. दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती यांच्या अधिपत्याखाली दरसाल हजारो वारकऱ्यांना पंढरपुरात व वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी कार्य करीत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.