Header Ads

Header ADS

जळगावमध्ये भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन – विविध कंपन्यांकडून भरती

 जळगावमध्ये भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन – विविध कंपन्यांकडून भरती

Grand placement drive organized in Jalgaon, recruitment from various companies

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 24- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हे ड्राईव्ह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे होणार आहे.

Grand placement drive organized in Jalgaon, recruitment from various companies

Grand placement drive organized in Jalgaon, recruitment from various companies

                     या ड्राईव्हमध्ये जैन फार्म फ्रेश फुडस.लि. शिरसोली व छब्बी इलेक्ट्रीकल्स, जळगाव या दोन नामांकित उद्योग संस्थांचा सहभाग असून, इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसह संबंधित सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

                   ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी देखील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहता येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अख्तर तडवी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.