Header Ads

Header ADS

विद्यार्थ्यांचे औक्षण, टाळ्यांच्या गजरात स्वागत; खासदार, आमदार, अधिकारी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग,जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


Jaḷagāva-jil'hyātīla-1860-śāḷāmmadhyē-śāḷā-pravēśōtsava-utsāhāta-sājarā


जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


विद्यार्थ्यांचे औक्षण, टाळ्यांच्या गजरात स्वागत; खासदार, आमदार, अधिकारी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग


लेवाजगत न्यूज जळगांव:- राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ जल्लोषात व आनंददायी वातावरणात करण्यात आला. जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.


या उपक्रमात खासदार स्मिता वाघ, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांनी सहभाग घेतला.




महत्त्वाचे ठळक प्रसंग –


अमळनेर तालुक्यातील जवखेडे शाळेत खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत, शालेय साहित्य व गणवेश वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम.


अडावद व कन्हेरे शाळांमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा.


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर तालुक्यातील भराडी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नांद्राबु. व पिलखेडे शाळेत "ग्रंथ दिंडी" सोबत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत केले.


तहसीलदार नीता लबडे (भुसावळ), निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे (शिरसोली), जनार्दन पवार (वडगाव लांबे), भुषण वर्मा (सावदा), राहुल पाटील (चोपडा), विवेक धांडे (जामनेर), कुर्बान तडवी (उर्दू शाळा), स्नेहा पवार (जिराळी), युवराज पाटील (विदगाव), रविंद्र उगले (महिंदळे), रविंद्र लांडे (गिरड), सुधीर सोनवणे (भडगाव), रवींद्र नाईक (गारखेडे), विजय बनसोड (पाचोरा) आदी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.



या उपक्रमामुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाल्याचे चित्र दिसून आले.



-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.