वै. डिगंबर महाराज मठात ३० जूनपासून भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ वारकऱ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था; कीर्तन-नामसंकीर्तनाचा भक्तीमय माहोल
वै. डिगंबर महाराज मठात ३० जूनपासून भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ
वारकऱ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था; कीर्तन-नामसंकीर्तनाचा भक्तीमय माहोल
प्रतिनिधी आमोदा:-
आषाढी वारीचे औचित्य साधून चिनावल येथील वै. डिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समितीच्या पंढरपूर येथील मठात ३० जूनपासून ते ७ जुलैपर्यंत भागवत कथा व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सप्ताहात खिर्डी (ता. रावेर) येथील दुर्गादास महाराज नेहेते श्रीमद् भागवत कथा वाचन करणार आहेत. यामध्ये दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत कथा वाचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
कीर्तन सेवेकरी कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
३० जून – अमोल महाराज भंजाले (रावेर)
१ जुलै – गोपाळ महाराज (विटवा)
२ जुलै – पोपट महाराज (कासारखेडे)
३ जुलै – भाऊराव महाराज (मुक्ताईनगर)
४ जुलै – रवींद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर)
५ जुलै – धनराज महाराज (अंजाळे)
६ जुलै – दुर्गादास महाराज नेहेते (खिर्डी)
७ जुलै – भरत महाराज (म्हैसवाडी) – काल्याचे कीर्तन
या सप्ताहात सहभागी होणाऱ्या भाविक व वारकऱ्यांसाठी निवास व भोजनाची सुविधा मठात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. मठ व्यवस्थापनाच्या वतीने सर्व भक्तांनी या भक्तिमय सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत