Header Ads

Header ADS

लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘हरित दिंडी’ उपक्रमांतर्गत ९७ झाडांचे वृक्षारोपण

Lōkasēvaka-madhukararāva-caudharī- yān̄cyā-97vyā-jayantīnimitta- ‘harita diṇḍī’-upakramāntargata-97- jhāḍān̄cē-vr̥kṣārōpaṇa


लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘हरित दिंडी’ उपक्रमांतर्गत ९७ झाडांचे वृक्षारोपण 

लेवाजगत न्यूज पाल तालुका रावेर:- लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘हरित दिंडी’ उपक्रमांतर्गत ९७ झाडांचे वृक्षारोपण यशस्वीरित्या पार पडले.

    हा उपक्रम, स्व.मधुकरराव चौधरी यांच्या ‘हिरवा सातपुडा’ या दूरदृष्टीपूर्ण स्वप्नाकडे एक नम्र वाटचाल आहे. या संकल्पनेतून निसर्ग आणि वन्यजीवाचे संवर्धन यासोबतच आदिवासी जीवन आणि संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश आहे.

आ.बाळासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भेदभावमुक्त समाज उभारण्यासाठी अर्पण केले. समाजातील विविध संस्कृतींचा सन्मान राखून, त्या एकत्र गुंफून, माणसांमध्ये ऐक्य व सलोखा निर्माण करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार आणि कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक वनविभाग,यावल वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी यांनी मोलाची साथ दिली, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.


 तसेच या उपक्रमाच्या अंमलबजावणीत ‘मधुस्नेह संस्था परिवार’ यांनी ‘लोकसेवक प्रतिष्ठान’ सोबत समन्वय साधून अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली, त्यांचेदेखील विशेष आभार कार्यक्रम प्रसंगी डॉ.राजेंद्र पाटील,लिलाधर शेठ चौधरी,मा.कुमार चौधरी,किशोरकाका महाजन,शेखर पाटील,मा.हमीद तडवी,कामिल शेठ,राजू सवरने,संजू जमादार,योगेश पाटील,उस्मान तडवी,महेश महाजन,सुधाकर झोपे,मो.हकीम मो.याकुब,सुनिल फिरके,नईम शेख,अनिल जंजाळे,रतन बारेला,किशोर चौधरी,सरफराज तडवी,लियाकत जमादार,लक्ष्मण मोपारी,संजय पवार,बबलू तडवी,संजय भालेराव,महेबूब जमादार,देविदास हडपे,यशवंत महाजन,भरत चौधरी,डिगंबर चौधरी,ललित चौधरी,अनिल तडवी,राजू चौधरी,अनिल महाजन,सुरज पाटील,राहुल पाटील,विजय कोळी,व्ही.आर.पाटील,आर.एल. चौधरी,उत्तम चव्हाण,रमेश झांबरे,रवींद्र कुमावत,नितीन भंगाळे,जितेंद्र पाटील,गोविंदा गुरुजी,अतुल महाजन,अतुल मालखेडे,सुनील सपकाळे,विवेक महाजन,दिनेश पाटील,दिलीप चौधरी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.