Header Ads

Header ADS

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा 15 आणि 16 जूनचा जळगाव जिल्हा दौरा


 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा 15 आणि 16 जूनचा जळगाव जिल्हा दौरा


लेवाजगत न्युज जळगाव:- (दि. 15 जून 2025) -राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांचा जळगाव जिल्हा दौरा रविवार, 15 जून व सोमवार, 16 जून रोजी होणार आहे. तो दौरा पुढील प्रमाणे.


रविवारी दुपारी 1.30 वाजता जामनेर येथे आगमन, श्री क्षेत्र रामवन मंदिर येथे दर्शन,त्यानंतर दुपारी 2.00 वाजता गांधी चौकातील भागीरथी वाचनालय येथे बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद. सायंकाळी 5.15 वाजता ते श्री. मूलचंद नाईक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सायंकाळी 6.15 वाजता मोटारीने जळगावकडे प्रयाण,सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृहात मुक्कामी.

    सोमवारी सकाळी 9.30 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजाचा आढावा, त्यानंतर दुपारी 2.00 वाजता पारोळा तालुक्यातील मोढाळे, टोळी व भामरखेडा येथील बंधाऱ्यांची पाहणी करतील. सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव, रात्री 8.50 वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.