केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्युज, केदारनाथ:
रविवारी सकाळी केदारनाथजवळील गौरीकुंड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात पायलटसह ५ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका बालकाचाही समावेश आहे.
आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर गौरीकुंडहून केदारनाथकडे निघाले होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच गौरीकुंडच्या जंगलात ते कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, गौरीकुंडहूनही बचाव पथक रवाना करण्यात आले आहे.
या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, अधिकृत तपास आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत