फैजपूरमध्ये महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सक्रिय
फैजपूरमध्ये महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सक्रिय
लेवाजगत न्यूज फैजपूर-शहरातील खंडोबा देवस्थानात सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर झाले. त्यात विविध प्रकारचे ६८१ दाखले, शालेय साहित्य, कर्ण यंत्र, वारस दाखले देण्यात आले. यावेळी खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनदास महाराज, भरत महाजन,आमदार अमोल जावळे, सुरेश धनके, पद्माकर महाजन, पांडुरंग सराफ, नितीन राणे, नीलेश राणे, नितीन नेमाडे, भाजप शहराध्यक्ष पिंटू तेली, सिद्धेश्वर वाघुळदे, बी. के. चौधरी, जयश्री चौधरी, गोटू भारंबे, अनंत नेहेते उपस्थित होते. यांची विशेष उपस्थिती होती.
फैजपूरचे प्रांत बबन काकडे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार संतोष विनंते, कृषी अधिकारी मंजुश्री गायकवाड, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दिवसेंदिवस महसूल विभागातील दाखल्यांची ऑनलाइन सेवा गतिमान झालेली आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या गावातच गरजेचे दाखले मिळावे. जेणेकरून तहसील, प्रांत कार्यालयात येण्याची आवश्यकता पडणार नाही. जिवंत सातबारा मोहीम सुरू केली. संजय गांधी योजनेचे अनुदान लाभार्थीचे थेट बैंक खात्यात जमा होते. गावागावात सेतू केंद्राच्या माध्यमातून आपल्याला सेवा सुविधा मिळत आहे. घरी बसून मोबाइलद्वारे ऑनलाइन दाखले काढता येतात, असे प्रांत काकडे यांनी सांगितले. तहसीलदार नाझीरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांची सुद्धा उपस्थिती होती. गणेश गुरव यांनी सूत्रसंचालन तर नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत