Header Ads

Header ADS

थोरगव्हाण गावात कृषी दूतांचे आगमन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, प्रयोग व जनजागृतीचे आयोजन

 


थोरगव्हाण गावात कृषी दूतांचे आगमन

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, प्रयोग व जनजागृतीचे आयोजन

लेवाजगत न्युज थोरगव्हान (ता. रावेर ) :
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी "ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम" (RAWE) अंतर्गत थोरगव्हान गावात दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी पुढील काही आठवडे गावात वास्तव करून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार आहेत.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील, तसेच विषयतज्ञ प्राध्यापकांकडून होत आहे.

कार्यक्रमासाठी गावात दाखल झालेले कृषी दूत पुढीलप्रमाणे आहेत.
दिनेश दिलीप महाजन, जयेश विठोबा माळी, पवन अरुण पाटील, प्रणव शंकर पाटील आणि शिवराज सदाशिव शेवाळे हे विद्यार्थी शेतकऱ्यांमध्ये शेतजमिनीचे माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड पद्धती, नवीन कृषी तंत्रज्ञान, पिकांवरील रोगांचे निदान व उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि शेतभेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी गावचे उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला. कृषीदूत शेतकऱ्यांशी नियमित संपर्क ठेवून शेतीविषयक समस्या व त्यावर उपाययोजना यावर चर्चासत्र घेणार असल्याची माहिती दिली.

हा उपक्रम गावातील शेती विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे, असा विश्वास ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.