Header Ads

Header ADS

लहान वाघोदा येथे विकसित कृषी संकल्प अभियान यात्रा उत्साहात संपन्न




लहान वाघोदा येथे विकसित कृषी संकल्प अभियान यात्रा उत्साहात संपन्न


लेवाजगत न्युज लहान वाघोदा : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या "विकसित भारत" या संकल्पनेतून सुरू झालेल्या विकसित कृषी संकल्प अभियान यात्रेचा थाटात समारोप लहान वाघोदा येथे करण्यात आला. २५ मे ते १२ जून या कालावधीत देशभरात राबवण्यात आलेल्या या अभियानाचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम महिला सरपंच सौ. दिपाली जितेंद्र चौधरी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुहास अमृतकर (पशु व मत्स्य कृषी विभाग, अकोला), डॉ. हेमराज भंडारी (कांदा व लसूण संशोधन विभाग, नागपूर), राधाकृष्ण (कृषी विद्यापीठ केंद्र, पुणे), महेश महाजन (कृषी विज्ञान केंद्र, पाल), शास्त्रज्ञ अतुल पाटील व धिरज नेहेते, तसेच ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चौधरी, उपसरपंच सत्तार पटेल, महसूल अधिकारी रमाकांत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध पिकांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले:
🔹 राधाकृष्ण - कांदा व लसूण पिकावरील सल्ला
🔹 अतुल पाटील - मका व कापसावर मार्गदर्शन
🔹 धिरज नेहेते - केळी पिकावरील उपाय
🔹 महेश महाजन - सर्व पिकांवरील लागवडीपासून काढणीपर्यंत माहिती

विशेष आकर्षण ठरले ते इफको कंपनीकडून सादर करण्यात आलेले ड्रोनद्वारे पीक फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, जे पाहून शेतकरी भारावून गेले.

कार्यक्रमात लहान वाघोदा येथील शेतकरी वसंत भास्कर शिंदे यांनी पीक स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व फुलगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन युवराज कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रा. पं. सदस्य जितेंद्र चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी कोळी व वैभव चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

गावातील पुंडलिक चौधरी, शशिकांत चौधरी, चांगदेव चौधरी, राहुल चौधरी, राजेश कोलते, रमेश शिंदे, संजय चौधरी, रामदास पाटील, अरुण शिंदे आदींसह शेकडो शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.