Header Ads

Header ADS

भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू !

 

Two close brothers died on the spot in a horrific accident!

भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू !

लेवाजगत न्यूज जळगांव-शहराजवळील निमखेडी शिवारात आज एका भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी मयत बांधवांची नावे आहेत.


निमखेडी येथील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही बंधू गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


Two close brothers died on the spot in a horrific accident!


मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. एकाच अपघातात दोघं सख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


ज्ञानेश्वर आणि प्रमोद शिवदे हे दोघेही बंधू पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.


दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.