केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा २८ जून ते ३० जून पर्यंत जळगाव जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा २८ जून ते ३० जून पर्यंत जळगाव जिल्हा दौरा
लेवाजगत न्यूज सावदा , दि. २८ जून -केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचा जळगाव जिल्ह्याचा तीन दिवसांचा दौरा २८ जूनपासून सुरू होत आहे. तो खालील प्रमाणे.
शनिवार, दिनांक २८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता संभाजीनगर विमानतळावरून मुक्ताईनगरकडे प्रयाण. रात्री १०:३० वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे येथे आगमन. मुक्ताईनगर येथे मुक्कामी.
रविवार, २९ जून रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासी शिबिर कार्यालयात शासकीय कामकाज. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत वेळ राखीव. ३ ते ६ वाजेपर्यंत स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांशी भेटीगाठी.रात्रीचा मुक्काम मुक्ताईनगर.
सोमवार, ३० जून रोजी, सकाळी ९:३० वाजता मुक्ताईनगर येथून जळगावसाठी प्रयाण करतील व १० वाजता जळगाव येथे पोहोचतील. यानंतर त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 'जिमखाना डे' निमित्त आयोजित सत्कार समारंभात सहभागी होतील. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत भारतीय जनता पक्ष कार्यालय, जळगाव येथे स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद.
संध्याकाळी ४ वाजता जळगाव येथून संभाजीनगरकडे प्रयाण करतील आणि संध्याकाळी ७:३० वाजता तेथे पोहोचतील.
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत