खिर्डीच्या दाम्पत्याचा बडोदा येथे अपघाती मृत्यू ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
खिर्डीच्या दाम्पत्याचा बडोदा येथे अपघाती मृत्यू
ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | खिर्डी (ता. रावेर) :- गुजरातमधील बडोदा येथे झालेल्या भीषण अपघातात खिर्डी (ता. रावेर) येथील ललित मुरलीधर भंगाळे (३६) व त्यांच्या पत्नी रुजुदा ललित भंगाळे (३४) यांचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच वाघोदिया पुलाजवळ घडली असून खिर्डी गावात शोककळा पसरली आहे.
ललित भंगाळे हे एल.अँड. टी या खासगी कंपनीत नोकरीस होते, तर रुजुदा भंगाळे या एस.एस.व्ही. शाळेत शिक्षिका होत्या. नेहमीप्रमाणे ललित यांनी पत्नीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने निघाले असताना, वाघोदिया पुलाजवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
मृतांच्या पश्चात त्यांना दुर्वाक (७ वर्षे) व विनय (९ महिने) अशी दोन लहान मुले आहेत.
या घटनेबाबत पल्लवी नारखेडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
ललित भंगाळे हे खिर्डी येथील शेतमजुरी करणारे मुरलीधर गिरधर भंगाळे यांचे एकुलते एक सुपुत्र होते. तर रुजुदा या फैजपूर (ता. यावल) येथील श्रीदत्त मेडिकलचे संचालक संजय महादेव झोपे यांच्या कन्या होत्या.
अपघाताची बातमी समजताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरात एकच शोककळा पसरली असून दोघांचे अकस्मात निधन हे गावासाठी मोठे दुःखदायक घटनेचे आहे.
(लेवाजगत न्यूज सेवा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत