Header Ads

Header ADS

वादळी वाऱ्याचा कहर! विजेच्या कडकडाटासह पावसामुळे जळगाव शहरातील अनेक भागांत नुकसान, प्रशासन सतर्क

 

वादळी वाऱ्याचा कहर! विजेच्या कडकडाटासह पावसामुळे जळगाव शहरातील अनेक भागांत नुकसान, प्रशासन सतर्क


लेवाजगत न्युज जळगाव :-

आज सायंकाळी जळगाव शहरात आलेल्या अचानक वादळी वाऱ्याने आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांना झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना समोर येत आहेत.



या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांसह बाधित भागांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत, संबंधित यंत्रणांना त्वरीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.   

      प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी यासाठी यंत्रणा कार्यरत असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.



नागरिकांना प्रशासनाचे आवाहन – कृपया सुरक्षित स्थळी राहा. कोणतीही आपत्कालीन गरज असल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधा.


 जिल्हा प्रशासन, जळगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.