Header Ads

Header ADS

विठुरायाच्या दर्शनासाठी भुसावळ मार्गे ४ विशेष गाड्यांच्या १४ फेऱ्या, पंढरपूर गाडी ५ जुलैला भुसावळातून सुटेल दुपारी ९.३० वाजता

 


विठुरायाच्या दर्शनासाठी भुसावळ मार्गे ४ विशेष गाड्यांच्या १४ फेऱ्या,
पंढरपूर गाडी ५ जुलैला भुसावळातून सुटेल दुपारी ९.३० वाजता 


लेवाजगत न्यूज सावदा:- आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी १ ते १० जुलैदरम्यान नागपूर आणि मिरज आषाढी विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होतील. यामुळे वारकऱ्यांना पंढरपूर जाणे व तेथून परत येणे सोयीचे होईल. या सर्व गाड्या भुसावळ जंक्शनवरून जातील.



या विशेष गाड्या विविध मार्गांवरून धावणार आहेत. यात नागपूर-मिरज विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होतील. ०१२०५ क्रमाकाची गाडी ४ व ५ जुलैला सकाळी ८.५० नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. तर ०९२०६ क्रमांकाची गाडी ५ व ६ जुलैला दुपारी १२.५५ वाजता मिरज येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल.या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव,मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड,कुडुवाडी, पंढरपूर, सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठेमहाकाळ, सलगरे आणि अरग येथे थांबा आहे.



अमरावती - पंढरपूर


नवी अमरावती - पंढरपूर विशेष गाडीच्या चार फेऱ्या होतील. ०१११९ नवीन अमरावती येथून २व५ जुलै २०२५ रोजी दुपारी २. वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर ०११२० पंढरपूरहून ३ व६ जुलैला सायंकाळी ७.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवी अमरावतीला येईल. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुडूवाडी येथे थांबा आहे.

खामगाव - पंढरपूर विशेष गाडी


खामगाव - पंढरपूर गाडीच्या चार फेऱ्या होतील. ०११२१ खामगावहून ३ व६ जुलैला सकाळी ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. ०११२२ पंढरपूरहून ४ व ७ जुलैला पहाटे ५ वाजता सुटून त्याच दिवशी सायं.


७.३० वाजता खामगावला पोहोचेल. जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुडूवाडी येथे थांबा मंजूर केला आहे.

भुसावळ - पंढरपूर विशेष गाडी



भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ०११५९ भुसावळहून ५ जुलैला दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल, परतीच्या प्रवासात ०११६० पंढरपूरहून ६ जुलैला रात्री १०.३०वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुडूवाडी येथे थांबणार आहे. या गाडीला १६ जनरल डबे असतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.