Contact Banner

"लाडकी बहीण" योजनेत अपात्र लाभार्थ्यांची शहानिशा; शासनाचा कठोर निर्णय

 

26 lakh sisters ineligible for Ladki Bahin Yojana: Money will stop coming from June, says Women and Child Development Minister Aditi Tatkare

लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांचा पर्दाफाश; २६.३४ लाख जणांचा लाभ तात्पुरता थांबवला — आदिती ठाकरे यांची माहिती

लेवाजगत न्यूज मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार उघड झाला असून, सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. ही माहिती युवानेत्री आदिती ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टद्वारे जनतेसमोर मांडली.

बाल विकास मंत्री अदिती ठाकरे यांची फेसबुक पोस्ट-https://www.facebook.com/100044434179623/posts/1280833090074485/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v

महिला व बालविकास विभागाने सर्व अर्जदारांची ओळख पटवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवली होती. त्यानुसार समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, काही लाभार्थ्यांनी एकाहून अधिक योजना घेतल्या, काही कुटुंबांतील दोनपेक्षा अधिक सदस्य लाभार्थी ठरले, तर काही पुरुषांनीही योजनेअंतर्गत अर्ज केल्याचे समोर आले आहे.


या पार्श्वभूमीवर जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याचवेळी पात्र ठरलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे.


शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आदिती ठाकरे यांनी नमूद केले आहे.


शासनाकडून अपात्र लाभार्थ्यांची शहानिशा सुरू असून, जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लवकरच पुन्हा लाभ सुरू करण्यात येणार आहे. आदिती ठाकरे यांच्या या फेसबुक पोस्टनंतर योजनेतील पारदर्शकतेबाबत जनतेत पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.