आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात – पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली प्रवासी खाजगी बस; एक मृत झाल्याचा अंदाज २५ जखमी
आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात – पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली प्रवासी खाजगी बस; एक मृत झाल्याचा अंदाज २५ जखमी
लेवाजगत न्यूज आमोदा: - आज सकाळी आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. इंदोरहून जळगावकडे येणारी श्री गणेश लक्झरी खासगी प्रवासी बस एम पी 09 -9009 ही पुलाचा कठडा तोडून थेट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अंदाज असून २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत.
बस पुलावरून सुमारे १५ फूट खोल खाली उलटलेली असून, अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या नदीमध्ये सुदैवाने पाणी नव्हतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा ब्रेक फेल होणे, हे संभाव्य कारण मानले जात आहे. घटनास्थळी पोलीस, आपत्कालीन सेवा आणि क्रेनच्या सहाय्याने बस हटवण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, आमोदा परिसरात हा या दोन महिन्यातील २८ वा अपघात असून, या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
(अधिक माहिती थोड्याच वेळात…)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत