Header Ads

Header ADS

अंगणात लोखंडी तिरडी आणि दारात अंत्यसंस्काराचं सामान ‘आपुलेचि मरण पाहिलं म्याडोळा’ — चूक ओळख, थांबलेले अश्रू आणि उलगडलेलं नाट्य!

 

‘My-own-death-seen-my-mind’ – mistaken-identity, held-back-tears, and the unfolding drama!

‘आपुलेचि मरण पाहिलं म्याडोळा’ — चूक ओळख, थांबलेले अश्रू आणि उलगडलेलं नाट्य!

अंगणात लोखंडी तिरडी आणि दारात अंत्यसंस्काराचं सामान

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | जळगाव-शनिवारी सकाळी पाळधीजवळ रेल्वेखाली चिरडून एका ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. चेहरा पूर्णतः विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणं अशक्य होतं. मात्र मृतदेहावरील कपडे पाहून पाळधीतील मिलिंद भालेराव यांनी तो आपला चुलत भाऊ रघुनाथ अर्जुन खैरनार असल्याचे सांगितले.

झालं! गावभर बातमी पसरली, शोककळा पसरली. त्यांच्या घरी रडारड सुरू झाली. पुण्याहून त्यांचा मुलगाही तातडीने रवाना झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घरी तिरडी आणली गेली, अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. सर्वजण अंत्ययात्रेसाठी सज्ज झाले, आणि...

...तेवढ्यात फोन आला — "रघुनाथ खैरनार तर इथे बसलेत!"

गावकऱ्यांनी आधी विश्वास ठेवला नाही. पण व्हिडिओ कॉल केला गेला. आणि काय आश्चर्य! पलीकडे बसलेले रघुनाथ खैरनार हात हलवत "मी जिवंत आहे" असं सांगत होते! क्षणात वातावरण बदललं. रडणारे थांबले, आणि हास्याचे लाट उमटल्या.






रघुनाथ खैरनार घरी परतले. पण अंगणात लोखंडी तिरडी आणि दारात अंत्यसंस्काराचं सामान त्यांना पाहायला मिळालं.

या नाट्यपूर्ण घडामोडींमुळे पोलीसही गोंधळले. मग खरे आत्महत्या करणारे कोण? शववाहिनीला तातडीने थांबवण्यात आले. घटनास्थळी पुन्हा पोलीस गेले. तिथे एक मोबाईल सापडला. त्यावरून शेवटचा कॉल केला असता, फोन उचलला शुभम ज्ञानेश्वर पाटील याने.

"वडील सकाळपासून बेपत्ता आहेत", अशी माहिती त्याने दिली. मग शुभमला शव ओळखण्यासाठी बोलावण्यात आले. मृतदेह पाहताच तो ओरडला — "हे माझे वडील – ज्ञानेश्वर अर्जुन पाटील!"





शेवटी खरी ओळख पटली. मृत व्यक्ती पथराड गावचे ज्ञानेश्वर पाटील होते. रघुनाथ खैरनार यांच्यासारखेच कपडे, वय व अंगकाठी यामुळे ही चूक झाली.

ही चकवा देणारी, भावनांचा उद्रेक करणारी आणि एकाच वेळी दुःख व हास्य पसरवणारी घटना पाळधी व परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

"आपुलेचि मरण पाहिलं म्याडोळा" – या उक्तीचा खरा अनुभव रघुनाथ खैरनारांनी घेतला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.