आमोदा येथे पुन्हा अपघात! ट्रक नाल्यात घसरला – ड्रायव्हर किरकोळ जखमी
आमोदा येथे पुन्हा अपघात! ट्रक नाल्यात घसरला – ड्रायव्हर किरकोळ जखमी
लेवाजगत न्युज आमोदा (ता. यावल), दि. ३ जुलै:- यावल तालुक्यातील आमोदा येथील मोर नदीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. आज दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास फैजपूरकडे जाणारा मालवाहू ट्रक (क्र. RJ 11 GC 8233) वळणावर ब्रेक न लागल्यामुळे थेट छोट्या पुलाजवळील नाल्यात घसरला. सुदैवाने या अपघातात ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला असून मोठी जीवितहानी टळली आहे.
कालच या रस्त्यावरील गतिरोधक हटवण्यात आले होते. काही स्थानिक नागरिकांनी यापूर्वी झालेल्या बस अपघातासाठी गतिरोधक जवळ अचानक ब्रेक लावल्यामुळे दुर्घटना घडल्याचे कारण मांडले होते. त्यामुळे प्रशासनाने हे गतिरोधक हटवले होते. मात्र, आता पावसाळ्यात रस्ता अधिकच धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दरवेळी अपघात होणाऱ्या या ठिकाणचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या ठिकाणी आजचा हा 23 वा अपघात होता .योग्य ती सुधारणा करून अपघात रोखावे, अशी मागणी ट्रकचालकासह परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत