पिंपरुड-सावदा रस्त्यावर कार झाडावर आदळली; भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
पिंपरुड-सावदा रस्त्यावर कार झाडावर आदळली; भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
लेवा जगत न्यूज | सावदा (ता. यावल):
पिंपरुड-सावदा रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघात घडला आहे. पिंपरुड गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर एक कार घसरून थेट झाडावर आदळली. या अपघातात एमएच १९ सीव्ही ९७१४ क्रमांकाची कार झाडावर सुमारे दहा फूट उंचीवर अडकलेली अवस्थेत सापडली.
घटनास्थळी कार व्यतिरिक्त कोणीही आढळून आलेले नाही. त्यामुळे अपघाताच्या वेळी कारमध्ये कोणी होते का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही, मात्र अपघाताचा प्रकार अत्यंत भीषण असल्याचे दृश्य पाहून स्पष्ट होते.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, गाडी अनियंत्रित होऊन घसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होत असून, अधिक तपास सुरू आहे.
— लेवाजगत न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत