चोपडा ग्रामिण पोलिसांची धडाकेबाज कारवाई: काळविटाच्या शिकारप्रकरणी दोघे जेरबंद
चोपडा ग्रामिण पोलिसांची धडाकेबाज कारवाई: काळविटाच्या शिकारप्रकरणी दोघे जेरबंद
लेवाजगत न्यूज | चोपडा | ता. १७ जुलै – चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वन्यजीव तस्करीप्रकरणी मोठी कारवाई करत काळविटाच्या शिकारप्रकरणी दोघांना अटक केली. या कारवाईत काळविटाचे मांस व दोन शिंगे जप्त करण्यात आली असून वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.
वाहतूक केसेस करणारे हवालदार राकेश तानकू पाटील आणि कॉन्स्टेबल गजानन मच्छिद्र पाटील यांना माहिती मिळाली होती की, मध्य प्रदेशातून आलेले दोन संशयित वैजापूरकडे काळविटाचे मांस विक्रीसाठी नेत आहेत. ही माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई राबवण्यात आली.
बोरअजंटी–वैजापूर रस्त्यावरील फॉरेस्ट कम्पार्टमेंट क्र. २३६ येथे वनविभाग व पोलीस पथकाने नाकाबंदी करून मोटरसायकल (क्र. एमपी १० एनसी ४८५७) वरून जाणाऱ्या दोन इसमांना थांबवले. तपासणीअंती त्यांच्या ताब्यातून काळविटाचे दोन शिंगे व मांस जप्त करण्यात आले.
अटक आरोपींची नावे वांगऱ्या फुसल्या बारेला (४८, रा. टाक्यापाणी, जि. बडवाणी, म.प्र.) व धुरसिंग वलका बारेला (४५, रा. बरुड, जि. खरगोन, म.प्र.) अशी असून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून वनविभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या संयुक्त कारवाईत पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहायक फौजदार राजू महाजन, विनोद पवार, चेतन महाजन, सुनिल कोळी यांच्यासह आर.एफ.ओ. विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम आणि अन्य वनरक्षकांचा सहभाग होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत