Header Ads

Header ADS

सरपंच पदासाठी बनावट जात दाखला; लवकरच ३ ठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता कोचुर खुर्द ग्रामपंचायतीतील सरपंच ज्योती कोळी यांच्यावर गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशीचे आदेश

 

District Magistrate orders Jalgaon Tehsildar to submit report for action against Kochur Khurd Sarpanch



 सरपंच पदासाठी बनावट जात दाखला; लवकरच ३ ठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता

कोचुर खुर्द ग्रामपंचायतीतील सरपंच ज्योती कोळी यांच्यावर गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशीचे आदेश


लेवाजगत न्यूज, कोचुर खुर्द :-

रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ज्योती संतोष कोळी यांनी *टोकरी कोळी* या मागासवर्गीय समाजाच्या जातीचा बनावट व बोगस दाखला सादर करून ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजय मिळवल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्या लिलाबाई घनश्याम तायडे यांनी केला आहे.


तायडे यांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार, सरपंच ज्योती कोळी यांनी जळगाव तहसील कार्यालयाच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून खोटा जात प्रमाणपत्र तयार केले. हे बनावट दाखले त्यांनी निवडणूक रिटर्निंग ऑफिसर, तहसीलदार आणि जात वैधता पडताळणी समितीकडे सादर केले होते.


या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी जळगाव यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, जळगाव तालुका तहसीलदार यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करण्यात आल्याने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे.


३ ठिकाणी तक्रारी दाखल – गुन्हे दाखल होण्याची शक्यता:

या प्रकारात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, लवकरच फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार करणे यासारख्या गुन्ह्यांत कारवाई होण्याची शक्यता आहे.


1. निवडणूक निर्णय अधिकारी – रावेर ग्रामपंचायत

2. तहसीलदार – जळगाव तालुका

3. जात वैधता पडताळणी समिती – धुळे


या प्रकरणाची चौकशी मंडळ अधिकारीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संपूर्ण रावेर तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


— लिलाबाई घनश्याम तायडे, ग्रामपंचायत सदस्य, कोचुर खुर्द








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.