डंपर व मोटरसायकलचा नशिराबादजवळ अपघात – एक तरुण जागीच ठार, मित्र गंभीर जखमी
नशिराबादजवळ डंपर व मोटरसायकल अपघात – एक तरुण जागीच ठार, मित्र गंभीर जखमी
लेवाजगत न्यूज नशिराबाद, दि. 19 जुलै 2025 (शनिवार):
नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याशेजारील पुलाजवळ शनिवारी सकाळी सुमारे ६ वाजता भीषण अपघात घडला. डंपर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत हर्षल राजू पाटील (वय १९, रा. वराड, ता. धरणगाव) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र कुणाल गायकू पाटील (रा. वराड) गंभीर जखमी झाला आहे.
दोघे युवक गावातील इतर ८ ते १० मित्रांसोबत बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात दर्शनासाठी दुचाकीवरून निघाले होते. मात्र, दर्शनस्थळी पोहोचण्याआधीच, नशिराबादजवळील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली.
या अपघातात हर्षलचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेला कुणाल गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हर्षल हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेनंतर वराड गावात आणि त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. नातेवाईक व गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत