Header Ads

Header ADS

हॉटेल मालकावर गोळीबार, परिसरात खळबळ

 

Hotel owner shot, chaos in the area

हॉटेल मालकावर गोळीबार, परिसरात खळबळ

यावल, लेवाजगत न्यूज – तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रायबा येथे हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या गोळीबारात हॉटेलचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल रायबा येथे दोन अज्ञात तरुण मोटारसायकलवर आले. त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करत बीयर मागितली. मात्र, हॉटेल मालक बाविस्कर यांनी बार बंद असल्याचे सांगत बीयर देण्यास नकार दिला. या कारणावरून रागावलेल्या तरुणांपैकी एकाने अचानक पिस्तूल काढून गोळीबार केला.

या घटनेत प्रमोद बाविस्कर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी तरुण मोटारसायकलवरून पळून गेले. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे.

पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.