Header Ads

Header ADS

जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसमधील जुगारावर LCB चा छापा – ८ जुगारी पकडले, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

 

LCB raids gambling at Hotel Royal Palace in Jalgaon city, 8 gamblers arrested, property worth Rs 20 lakhs seized







जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसमधील जुगारावर LCB चा छापा – ८ जुगारी पकडले, २० लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील जयनगर परिसरातील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूम नं. २०९ मध्ये तिनपत्ती जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तिथे छापा टाकत आठ जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे १९.९७ लाख रुपयांचा रोख व १३ मोबाईल हॅन्डसेटसह एकूण सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जिल्ह्यात वाढत असलेल्या जुगारप्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार आणि लेखी आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


दिनांक ११ जुलै २०२५ रोजी रात्री १२.०१ ते १.०० वाजेच्या दरम्यान, पो.उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली सहा. फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, संदीप चव्हाण, पो.ना. किशोर पाटील आणि पो.कॉ. रविंद्र कापडणे यांनी हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर येथील रूम नं. २०९ मध्ये छापा टाकला. ही रूम मदन लुल्ला यांच्या नावे बुक होती.


छाप्यादरम्यान, तिन पत्ती (झन्ना मन्ना) जुगार खेळताना आठ इसम आढळून आले. त्यांच्याकडून १९,९७,०००/- रुपये रोख रक्कम, तसेच विविध कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले. सर्व आरोपींविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्र. २५३/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ), ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाणे करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.