Contact Banner

लेवा सखी कलामंच डोंबिवली आयोजित गुणगौरव सोहळा व मंगळागौर कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

 

Leva-Sakhi-Kalamanch-Dombivli- organized-appreciation-ceremony-and-presence-of-dignitaries-at-Mangala-Gaur-program

लेवा सखी कलामंच डोंबिवली आयोजित गुणगौरव सोहळा व मंगळागौर कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

Leva-Sakhi-Kalamanch-Dombivli- organized-appreciation-ceremony-and-presence-of-dignitaries-at-Mangala-Gaur-program



डोंबिवली प्रतिनिधी | लेवा जगत न्यूज

लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसर यांच्या वतीने गुणगौरव सोहळा आणि पारंपरिक मंगळागौर कार्यक्रम दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी लेवा भवन, डोंबिवली येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू मामा भोळेआमदार अमोल दादा जावळे यांच्यासह माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक ठेवा जपणारी पारंपरिक मंगळागौर उत्सवमय वातावरणात साजरी होणार आहे.

या निमित्ताने समस्त लेवा बंधू-भगिनींनी एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा गौरव साजरा करावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्षा सौ. निशाताई अत्तरदे यांनी केले आहे. समाजबांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






(लेवा समाजाच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.