सावदा येथे विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापूजा
सावदा येथे विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापूजा
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – सावदा येथील गांधी चौकातील ऐतिहासिक विठ्ठल-रुक्माई मंदिरात येत्या ६ जुलै रोजी सकाळी ५.३० वाजता आषाढी एकादशीनिमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. फैजपूर येथील खंडेराव देवस्थानाचे विश्वस्त पवनदास महाराज यांच्या हस्ते आणि मान्यवर संतगणांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तींना अभिषेक व महापूजा संपन्न होणार आहे.
महापूजेनंतर मंदिरात भजन, हरिपाठ यांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांना साबुदाणा खिचडी, केळी व ओली खजूर यांचे महाप्रसादरूपाने वाटप केले जाणार आहे.
सुमारे सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत असून, मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने नटला आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी स्थानीय व परिसरातील सर्व हरिभक्त माऊलींनी उपस्थित राहून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत