आमोद्यात जोरदार पाऊस, संध्याकाळी पुन्हा अपघात
आमोद्यात जोरदार पाऊस, संध्याकाळी पुन्हा अपघात
लेवाजगत न्यूज आमोदा- परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपासून सतत जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे संध्याकाळी सुमारे ५.१५ वाजता एक ट्रक (क्र. जेके ०२ डीझी ४५६६) मोर नदीजवळ रस्त्यावरून घसरून कडेला जाऊन धडकला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झाली नाही.या परिसरात झालेला हा २५ सावा अपघात आहे.
सदर ट्रक रस्त्याच्या कडेला अडकून अपघातग्रस्त स्थितीत आढळला. याच ठिकाणी गुरुवारी एक मालवाहू ट्रक व शुक्रवारी सकाळी एक बस देखील अपघातग्रस्त झाली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोमेजलेल्या पिकांना दिलासा मिळाला असून काही शेतकऱ्यांनी तुरळक पेरणीस प्रारंभ केला आहे. संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत