महिलेचा खून : ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
महिलेचा खून : ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी निंभोरा-
निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंभोरासिम - नांदुपिंप्री दरम्यानच्या तापी नदी पुलाजवळ एक भयावह घटना समोर आली आहे. दिनांक २४ जुलै रोजी तापी नदीत एका सुमारे ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. विशेष म्हणजे, तिचे हात-पाय दोरीने बांधलेले होते आणि सिमेंटच्या खांबाच्या तुकड्याला तिचे शरीर बांधून नदीत फेकल्याचा पोलिसांना संशय आहे.
या घटनेनंतर पोलिस कर्मचारी सुरेश पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, एपीआय हरिदास बोचरे आणि उपनिरीक्षक अभय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी गुन्हे शाखेने तिचे स्केच तयार करून घेतले आहे. त्यावरून एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रतिरुप छायाचित्रही तयार करण्यात आले. तथापि, अद्यापपर्यंत तिची ओळख पटलेली नाही.
परिसरातील हॉटेल्स, लॉजेस व खबऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली जात असून, शेजारच्या पोलिस ठाण्यांतील बेपत्ता महिलांच्या नोंदींचीही पडताळणी सुरू आहे.
कोणालाही या महिलेबाबत माहिती असल्यास कृपया त्वरित निंभोरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एपीआय बोचरे यांनी केले आहे.
टीप: जर आपणास कुणी अशी महिला अलीकडे बेपत्ता असल्याचे माहिती असेल, किंवा स्केच/छायाचित्र ओळखीचे वाटत असेल, तर कृपया सामाजिक जबाबदारीने पोलिसांशी संपर्क साधा.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत