Contact Banner

संत रोहिदास महाराज सभागृहासाठी निधी मंजूर : राधेश्याम बरय्या यांच्या प्रयत्नांना मिळाले यश







संत रोहिदास महाराज सभागृहासाठी निधी मंजूर : राधेश्याम बरय्या यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

गडचिरोली | लेवा जगत न्यूज प्रतिनिधी-

गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये संत रोहिदास महाराज सभागृह उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम बरय्या यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश लाभले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे संत रोहिदास महाराज सभागृहासाठी ठोस मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल घेत, आमदार आत्राम यांनी स्वतः पुढाकार घेतला व समाज कल्याण मंत्री संजय सावकारे आणि गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्याशी समन्वय साधून निधी उपलब्ध करून दिला.

या गावांना मिळणार सभागृहाचा लाभ

या निर्णयाअंतर्गत चोप, वीसोरा, आमगाव, कोरेगाव, बोळधा, कसारी, कोकडी, पोटगाव, विहिरगाव आणि सावंगी या गावांमध्ये सभागृह उभारणीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. हे सभागृह सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयोगी ठरणार असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

समाजातील मान्यवरांचे सहकार्य व मार्गदर्शन

या ऐतिहासिक कार्यात रविजी गर्जे (मुंबई), राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ नाकाडे, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम, राज्य महासचिव ज्ञानदेवजी कदम, व प्रदेशाध्यक्ष देवप्पा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.

सर्वच स्तरांतून आभार व्यक्त

या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय आत्मारामजी सूर्यवंशी, चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीनजी लाडे, तसेच राका कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम बरय्या यांनी मन:पूर्वक आभार मानले.

समाजात आनंदाचे वातावरण

संत रोहिदास महाराज सभागृहासाठी निधी मंजूर झाल्याने चर्मकार समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. हा निर्णय समाज सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात असून, यामुळे ग्रामीण भागात सामाजिक चळवळींना नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


लेवा जगत न्यूज
(आपल्या हक्काचं लोकसंवाद माध्यम)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.