Header Ads

Header ADS

सावदा मर्चंट को-ऑप. सोसायटी घोटाळा – एक वर्ष फरार असलेला मुख्य व्यवस्थापक रविंद्र वाणी अखेर अटकेत!

Sāvadā-marcaṇṭa-kō-ŏpa-sōsāyaṭī-ghōṭāḷā-ēka-varṣa-pharāra-asalēlā-mukhya-vyavasthāpaka-ravindra-vāṇī-akhēra-aṭakēta!



सावदा मर्चंट को-ऑप. सोसायटी घोटाळा – एक वर्ष फरार असलेला मुख्य व्यवस्थापक रविंद्र वाणी अखेर अटकेत!

लेवाजगत न्यूज, सावदा |
सावदा येथील मर्चंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात संस्थेचा तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रविंद्र रमेश वाणी याला अखेर अटक करण्यात आली आहे. जवळपास एक वर्षापासून फरार असलेल्या वाणीला रसलपूर येथून ताब्यात घेण्यात आले असून, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


Sāvadā-marcaṇṭa-kō-ŏpa-sōsāyaṭī-ghōṭāḷā-ēka-varṣa-pharāra-asalēlā-mukhya-vyavasthāpaka-ravindra-vāṇī-akhēra-aṭakēta!

Sāvadā-marcaṇṭa-kō-ŏpa-sōsāyaṭī-ghōṭāḷā-ēka-varṣa-pharāra-asalēlā-mukhya-vyavasthāpaka-ravindra-vāṇī-akhēra-aṭakēta!


फसवणूक कशी घडली?
रविंद्र वाणी याने आपल्या पदाचा गैरवापर करत संस्थेचे ६ कर्जदारांकडून एकूण ₹८.५ लाख (मुद्दल व व्याजासह) रक्कम स्वीकारली, मात्र ती पतसंस्थेच्या बँक खात्यात न भरता स्वतःसाठी वापरली. कर्ज भरणा झाल्याचे बनावट दाखले आणि पावत्या तयार करून संस्थेला गंडा घातल्याचा आरोप आहे.

तसेच, वाणीने संस्थेच्या महत्त्वाच्या फाईल्स व रेकॉर्ड्स स्वतःजवळ ठेवले होते आणि प्रशासक, काळजीवाहक अधिकारी किंवा अवसायक यांना त्या वेळोवेळी मागूनही दिल्या नव्हत्या. यासंदर्भात सावदा पोलीस ठाण्यात IPC कलम 406, 420, 464, 465, 467, 468, 471, 474 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई
या गुन्ह्याचा तपास सपोनि विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. राहुल सानप, पो.उ.नि. अमोल गर्जे, पोह. उमेश पाटील, निलेश बाविस्कर, पोकॉ मयुर पाटील व मपोकॉ गीता कदम यांच्या पथकाने वाणीला अटक केली.

संचालक मंडळही रडारवर!
तपासादरम्यान समोर आले आहे की पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ऐपत नसलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले, तसेच काही कर्जदारांचे नातेवाईक किंवा संचालक स्वतःही जामीनदार होते. यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती कोलमडली.

काही प्रकरणांमध्ये तारण मालमत्तांवरील बनावट कागदपत्रे तयार करून बोजा कमी करण्यात आला, ज्यात वाणी आणि अन्य आरोपींचा संगनमत होता. याबाबत संबंधितांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

ठेवीदारांसाठी विशेष सूचना
ज्यांचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत, अशा ठेवीदारांनी सावदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उ.नि. राहुल सानप करत आहेत.





(अधिकृत माहिती व अपडेटसाठी – वाचा लेवाजगत न्यूज)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.