Header Ads

Header ADS

सावद्यात नालंदा बौद्ध विहार परिसरातून दुचाकी चोरी

सावद्यात नालंदा बौद्ध विहार परिसरातून दुचाकी चोरी


सावद्यात नालंदा बौद्ध विहार परिसरातून दुचाकी चोरी

 लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :– शहरातील नालंदा बौद्ध विहार परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजता दुचाकी चोरीची घटना घडली. निरज सोनवणे यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेली MH 19 ED 8152 क्रमांकाची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक पोलीस तपास करत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणाला सदर दुचाकी दिसल्यास किंवा परिसरात संशयास्पद हालचाली जाणवल्यास तात्काळ स्थानिक पोलिस ठाणे किंवा निरज सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.