फैजपूर खंडोबा देवस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव आणि ब्रह्मलीन महंत घनश्याम दाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार
फैजपूर खंडोबा देवस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव आणि ब्रह्मलीन महंत घनश्याम दाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार
११ जुलै ते १८ जुलै दरम्यान संगीतामय श्रीमद् भागवत कथा; संत-महंतांच्या उपस्थितीत भव्य आध्यात्मिक पर्व
लेवाजगत न्यूज फैजपूर (ता. यावल) प्रतिनिधी:- फैजपूर येथील खंडोबा देवस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव आणि ब्रह्मलीन महंत घनश्याम दाजी महाराज यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त सप्ताहव्यापी श्रीमद् भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव ११ जुलै ते १८ जुलै २०२५ या कालावधीत संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार असून, यावेळी देशभरातील संत-महंतांची भव्य उपस्थिती लाभणार आहे.
भागवत कथाकथन
या महोत्सवात ह.भ.प. भरत महाराज म्हैसवाडीकर (म्हैसवाडी) हे सात दिवस संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत भक्तिपर भागवत कथा रसिकांसमोर सादर करणार आहेत. कथा स्थळ खंडोबा देवस्थान, फैजपूर येथेच राहणार आहे.
संत-महंतांचा मेळावा:
या कार्यक्रमात खालील प्रख्यात संत, महंत व महामंडलेश्वर आपली उपस्थिती नोंदवणार आहेत:
प.पू. कमलनयनदासजी महाराज (अयोध्या),प.पू. रामकिशोरदासजी शास्त्री, महामंडलेश्वर रामस्नेहीदासजी महाराज, महामंडलेश्वर अजयसमदासजी महाराज (नाशिक, नागपूर),महंत विष्णुदासजी महाराज (सप्तशृंगीगड), आचार्य जनार्दनहरिजी महाराज (फैजपूर),महंत गोपाल चैतन्यजी महाराज (पाल), कृष्णदासजी महाराज (नांदेड), महंत कृष्णगिरीजी महाराज (सावदा),आचार्य मानेकर मोठे बाबा (सावदा)महंत अद्वैतानंदसरस्वती (कानळदा), महंत स्वरूपानंदजी महाराज (डोंगर दे), ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर),धनराज महाराज (अंजाळेकर), महंत गणेशगिरीजी महाराज (जिन्सी), भरतदासजी महाराज (कुसुंबा),शास्त्री अनंतप्रकाशदासजी, स्वयंप्रकाशदासजी, घनःश्यामदासजी महाराज (शिवपुरी),महंत महावीरदासजी, कन्हैयादासजी महाराज (चिनावल), राघवेंद्रदास रामजानकीक्ष (भरुच),प.पू. गेंदानाथजी महाराज (भुसावळ), कन्हैयाप्रभु (फैजपूर), जानकीदास महाराज (रावेर),विठ्ठल महाराज (शेंदुर्णी), तपस्वी हरिदासजी महाराज (कानड), भोलेबाबा महाराज (वाघोदा),महंत हरीदास महाराज (इच्छापूर), ऋषिकेश महाराज (रावेर), दुर्गादास महाराज (खिर्डी),दत्तात्रेय महाराज (डोंगरकोठारा), संतोषदास महाराज (कुसुंबा), प्रवीण महाराज (फैजपूर),रामेश्वर महाराज (बामणोद), ललित माळी महाराज (खिरोदा), पियुष राजदेकर बाबा (फैजपूर),ब्रह्मकुमारी शकुंतलादीदी (फैजपूर) यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
११ जुलै:दुपारी २ वाजता शहरातून भव्य कलश यात्रा निघेल, त्यामध्ये शेकडो महिला, भक्तगण व संत सहभागी होणार.११ ते १७ जुलै ,दररोज संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत भरत महाराज म्हैसवाडीकर यांचे श्रीमद् भागवत कथावाचन.१८ जुलै (समारोप)सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन,१० ते १२ – संतांचे आशीर्वचन १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद
भक्तांसाठी विशेष आवाहन
या पवित्र सप्ताहात भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक आनंद, संतसंग, आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे गादीपती पुरुषोत्तमदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवन दाजी महाराज आणि राममनोहर दाजी महाराज यांनी केले आहे.
'गुरुचे स्मरण, संतांचा संग आणि भागवताचा रंग – एक अध्यात्मिक पर्व!'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत