श्री.र.न.मेहता हिंदी विद्यालयात परिवहन समितीची बैठक उत्साहात संपन्न
श्री. र. न. मेहता हिंदी विद्यालयात परिवहन समितीची बैठक उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षाचालक व पालकांना मार्गदर्शन
लेवाजगत न्यूज भुसावळ | श्री. र. न. मेहता हिंदी विद्यालयात शालेय परिवहन समितीची बैठक उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित या बैठकीत शहर वाहतूक पोलीस रवींद्र सपकाळे व प्रशांत चव्हाण यांनी रिक्षा चालक आणि पालकांना शालेय वाहतुकीसंदर्भातील नियमांची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांची वाहतूक करताना रिक्षाचालकांनी आणि पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, काय नियम पाळावेत, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीदरम्यान रिक्षाचालक आणि पालकांनी आपल्या अडचणी मांडल्या असून, त्या समस्यांचे समाधानही बैठकीत करण्यात आले.
रवींद्र सपकाळे आणि प्रशांत चव्हाण यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालक, रिक्षाचालक आणि शालेय प्रशासनाने मिळून परिवहनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे."
या प्रसंगी श्री. रवींद्र पाटील सर आणि श्री. दीपक तेली सर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश खोडपे सर यांनी केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रिता शर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या बैठकीचे उत्तम नियोजन व आयोजन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत