धनाजी नाना महाविद्यालयात मियावाकी घनवन प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण; लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
धनाजी नाना महाविद्यालयात मियावाकी घनवन प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण; लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
सावदा प्रतिनिधी -येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर तर उदघाटक मा. श्री व्ही एल माहेश्वरी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे यांनी मियावाकी घनवन प्रकल्पाविषयी माहीती दिली. या प्रकल्पासाठी विद्यापीठाने ५० हजार रूपये दिले. संस्थेने १ एकर जागा उपलब्ध करून दिली. मा. शिरिषदादा यांनी ५१ हजार रूपये या प्रकल्पास मदत दिली आणि धनाजी नाना महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी ७५ हजार रूपये दिले. या प्रकल्पासाठी यावल पुर्व वनविभाग यावल यांनी सहाशे (६००) रोपे उपलब्ध करून दिली. यात सातपुड्याच्या जंगलात जे भारतीय प्रजातीच्या औषध वनस्पती, अर्जुन बेहडा बाभूळ निंब, अमलताश, बदाम, पिंपळ, मोह, करंजी, खैर, कवट,अशा अनेक प्रजातींची रोपे आहेत, याप्रसंगी हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक या संस्थेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. नाना पाटील सर भुसावळ यांनी हिरवांकुर ही पुस्तीका मा. शिरीषदादा चौधरी व मा. कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी यांना भेट स्वरूपात दिली. सोबत रक्षा व अस्थी विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावा व विविध प्रसंगी वृक्षारोपण करून संवर्धन करा असे आवाहन केले.
मा. कुलगुरू मा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी मियावाकी घनवन प्रकल्पामुळे परिसरातील तापमानात लक्षणीय घट बघावयास मिळेल, परिसरातील लोकांचे आरोग्य व आहारात सुधारणा होण्यास मदत होईल. भारतातील अनेक प्रदुषित शहरात लोकांचे आरोग्य सरासरी तीन वर्षांनी कमी होत आहे यावर एकच पर्याय म्हणजे “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश दिला.
मा.शिरीषदादा चौधरी यांनी अध्यक्षीय समारोप करतांना स्व. मधुकरराव चौधरी यांनी हिरवा सातपुडा ही संकल्पना राबवली. त्यासाठी सातपुडा विकास मंडळाची स्थापना केली. पुठे जावून जनता शिक्षण मंडळासोबत दर्जेदार शिक्षणाची सुरवात केली. त्यांच्या मते निसर्गरम्य ठिकाणी विद्यादानाचे उत्तम होत असते अशी आठवन सांगितली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा मियावाकी घनवन प्रकल्प उत्तमपणे राबवून त्याचे व्यवस्थीत संगोपन करून परीसरात आदर्श निर्माण करू असे मत व्यक्ते केले.
याप्रसंगी तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री मिलिंद शंकर वाघुळदे, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव प्रा. नंदकुमार आसाराम भंगाळे, सदस्य डॉ. शशिकांत सदाशिव पाटील, सदस्य श्री संजय काशिनाथ चौधरी, हिरवांकुर या संस्थेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री.नाना पाटील, प्राचार्या डॉ अरूणाताई चौधरी युवानेते मा. धनंजयभाऊ चौधरी, मा. अजितदादा पाटील, मा. झांबरे सर,मा. झोपे सर यासह धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे , प्राचार्य डॉ राजेश यादव चौधरी, प्राचार्य डॉ रवींद्र एल चौधरी, , प्राचार्या लता मोरे, प्राचार्य डॉ.सी.पी. लभाणे, मधुस्नेह परीवारातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.आर.आर राजपूत व डॉ.सिमा बारी यांनी केले तर आभार. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य, डॉ. हरीष नेमाडे, डॉ. मनोहर सुरवाडे डॉ. कल्पना पाटील आणि प्राध्यापक, वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, के एल धनगर, नितीन दादा यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रा. शिवाजी मगर, प्रा. मंदार बामणोदकर, श्री. संतोष तायडे शिक्षकेतर कर्मचारी एन.सी.सी, एन.एस.एस. दामाधर नाना प्रबोधीनीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी याचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत