Contact Banner

सावदा शहरात आज मानाच्या राजाचे आगमन – चैतन्य गणेश मंडळाचा 72 वा उत्सव भव्य थाटामाटात

 

सावदा शहरात आज मानाच्या राजाचे आगमन – चैतन्य गणेश मंडळाचा 72 वा उत्सव भव्य थाटामाटात


लेवाजगत न्युज सावदा :

सावदा शहरातील सर्वांत प्रसिद्ध व नावाजलेले चैतन्य गणेश मंडळ यंदा आपल्या ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज रविवार, २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता दुर्गामाता मंदिर येथून मानाच्या राजाच्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ होणार असून शहरात भक्तिमय व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.


या वर्षी गणरायाची २४ फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली असून ती बुऱ्हाणपूर (म. प्र.) येथील प्रसिद्ध शिल्पकार अतुल वैद्य यांनी घडवली आहे. आगमनासाठी विटाई येथील श्री शिव तांडव बँड तसेच तब्बल १०० पारंपरिक ढोल-ताशा पथके सज्ज झाली आहेत.


मानाच्या राजाच्या स्वागतासाठी संपूर्ण सावदा शहर तसेच पंचक्रोशीतील भाविक उत्सुकतेने थांबले आहेत. तरुणाईत विशेष जोश दिसून येत असून“गणपती बाप्पा मोरया” या जयघोषात आज शहर दुमदुमून जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.