Contact Banner

युवा समिती भोरगाव लेवा पंचायत तर्फे कवयित्री बहीणाबाई चौधरींना अभिवादन

युवा समिती भोरगाव लेवा पंचायत तर्फे कवयित्री बहीणाबाई चौधरींना अभिवादन


युवा समिती भोरगाव लेवा पंचायत तर्फे कवयित्री बहीणाबाई चौधरींना अभिवादन

लेवाजगत न्यूज अंबरनाथ :
युवा समिती भोरगाव लेवा पंचायत यांच्या वतीने अंबरनाथ शहरात कवयित्री बहीणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. ॲड. मधुर भोळे यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात लेवा गणबोली दिनानिमित्त लेवा समाजबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक वासुदेव भोळे यांनी बहीणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी युवा समिती मुंबई विभाग प्रमुख मयुरेश नरेंद्र कोल्हे, शहर अध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष भरत महाजन, सरचिटणीस रुपाली कोल्हे, सदस्य शुभम काळे, हर्षाली कोल्हे, ॲड. मधुरा भोळे, मयुरेश भोळे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि लेवा समाजबांधव उपस्थित होते.

रुपाली कोल्हे यांनी आपल्या भाषणातून बहीणाबाईंच्या साहित्यकृती व लेवा गणबोलीच्या जतनाविषयी माहिती दिली. मयुरेश कोल्हे यांनीही आपल्या मनोगतातून बहीणाबाईंच्या कार्याचे स्मरण करून समाजबांधवांना प्रेरणादायी संदेश दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.